https://myuniverse136.blogspot.com/ भगवान बिरसा मुंडा -एक आदिवासी क्रांती दूत ( BIRSA MUNDA )

Subscribe Us

Header Ads

भगवान बिरसा मुंडा -एक आदिवासी क्रांती दूत ( BIRSA MUNDA )

                                          " तलाश ना कर मुझे जमीन 
                                                   आसमान की गर्दिशो में ||
                                            में जिन्दा हू जप तक 
                                          जब तक मेरा विचार आप लोगो के दिलो में हे || "
                                        
                                         
भगवान बिरसा मुंडा 

सन १८७५  भारत गुलामगिरिच्या काळोख्यात झाकला गेला होता. अज्ञान अंधश्रद्धा यामध्ये जनता भरकटलेली होती त्यात होता इंग्रजांचा जुलमी अत्याचार अशा परिस्थितीत जनता जिवंतपनीच मेल्या सारखी झाली होती . अश्या अंधकारातून जणू सूर्य उगवावा तसा बिरसा मुंडा यांचा जन्म झाला आणि  भारताच्या उराव  ,मुंडा तसेच  खडी आदिवासी जमितीने आपला उद्धारक मिळवला . बृहस्पती वारी जन्म झाला म्हणून त्याचे नाव बिरसा ठेवले गेले . 

सुरुवातीचे जीवन : 

छोटा नागपूरचे पठार परिसरात मुंडा आदिवासी जमात राहत असे .बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड मधील उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला. वडील सुगन मुंडा यांनी गरिब परिस्थिती मुळे बिरसाला आपल्या मावशीकडे पाठविले  होते. बिरसा बासरी छान वाजवत असे . संगीत मध्ये बिरसा एव्हडा गुंतलेला असे की त्याचे कामाकडे लक्ष नसे परिणामी मावशीने त्याला मार दिला आणि बिरसा घाबरून आपल्या गावी वडिलांकडे परतला .वडिलांनी त्याला शेजारील गावात असलेल्या नातेवाईकाकडे पाठवले . 

बिरसाचे शिक्षण :

बिरसाला जर्मन मिशनरी शाळेत टाकण्यात आले होते . दरम्यान त्याच्या वडिलांना बळजबरीने धर्मांतरण करण्यास भाग पाडले याची  बिरसाला चीड होती . शाळेत शिकत असतांना भारतातील गुलामगिरी ,दरिद्रता याबद्दल कळू लागले . बिरसाने शोषणाचे अनेक दुःखदायक प्रसंग बघितले. तो  जिथे जात असे तिथे भय आतंकता दिसून येत असे . 
                         
इंग्रज कालीन परिस्थिती दर्शवणारे एक चित्र 

अंगाला काटा आणनारा प्रसंग :

बिरसाने सरकारी नौकरी करण्यास नकार दिला . आदिवासींच्या जमिनी ,पीक यांच्यावर ईस्ट इंडिया कंपनीने कोर्ट ,कचेरी ,जमीनदार ,जहागीरदार लादले . सर्व आदिवासीं प्रमाणे बिरसाच्या घरातही खाण्यासाठी काहीही नव्हते. घरातील सदस्य उपाशी त्यात बिरसाने सरकारी नौकरीला दिलेला नकार पाहून त्याच्या वडिलांनी संतापात त्याला मारले, बिरसा रडत -रडत नदी काठी गेला.  जवळच असलेल्या स्मशानात मृतदेहावर अंत्यसंस्कार चालले होते . अंत्य संस्कार झाल्यानंतर तेथील लोक गेल्यानंतर बिरसा तिथे गेला आणि मृत व्यक्तीची कबर खोदून त्याला अर्पित केलेले दागिने  काढून त्याच्याने खाण्याचे पदार्थ आणून घरच्यांची भूक भागवली . घरच्यांनी बिरसाला प्रश्न केला असता तो म्हणाला "भगवंत दयाळू आहे" . घडलेली  घटना एका  गावकऱ्याने पहिली होती ,गावकरी पळत पळत  बिरसाच्या घरी आला आणि वस्तुस्थिती त्याच्या वडिलांना संगीतली . वडिलांनी जाब विचारल्यावर बिरसा म्हणाला "मुडद्याला भूक लागत नसते ,जिवंत माणसाला भूक लागते ,म्हणून मी ते दागिने आणले "वडील जेवत्या ताटावरून उठले बिरसाला बेदम मारहाण करत घराच्या बाहेर काढले. 

बिरसा मुंडा यांना भगवान हा दर्जा कसा मिळाला :

बिरसा ने आदिवासी क्षेत्राचे विचारान केले त्यावेळेस आपापसातली फूट , गरिबी ,भेद ,असंगटन दिसून आले . त्यांनी उराव ,मुंडा खडी आदिवासी यांच्या मुखियांशी भेटी केल्या . त्यांनी जनजागृतीस सुरुवात केली. शोषित व पीडित आदिवासींमध्ये ज्ञान व शक्तीची ज्योत जागवली . 

जण जग्रुती करतांना बिरसा मुंडा 
अशा पद्धतीने जंगलातून जे मिळेल ते खाऊन, उपाशी राहून त्यांनी आपले जागृती आंदोलन पुढे चालू ठेवले . बिरसा मुंडा यांनी अनेक दिवस जंगलात राहून काढले . पुढे त्यांना आनंद पांडे म्हणून पंडितजी भेटले . ते बिरसा मुंडा यांना आपल्या सोबत घरी घेऊन गेले . आनंद पांडेंसोबत राहून त्यांनी संस्कृती व समाजाची शिक्षा घेतली . 
सोबत  त्यांनी आयुर्वेदिक ज्ञान प्राप्त केले . ते जंगलात जाऊन विविध औषधी वनस्पती शोधत असे . पुढे बिरसाने आश्चर्य जनक बुद्धी कौशल्याने आणि परिश्रमाने औषधी विज्ञानात प्रगती केली . 
पुढे बिरसा आपल्या गावाला परतले . त्यांच्या  आईला त्यांची कपाळपट्टी चमकत असल्याचे दिसले. त्यावेळेस बिरसा मुंडा यांनी आपल्याला भगवान सिंग बोनगा यांचं दर्शन झाल्याचे सांगितले . "सिंग बोनगा यांनीच आपल्याला कोणत्याही रोगील सुदारू शकण्याचा  आशीर्वाद ही दिला आहे . तसेच  त्यांनी मला हुकूम दिला की मुंडांना जमीनदार ,जाहीगीरदार ,फिरंगी यांच्या पासून मुक्त कर . "
अशा पद्धतीने बिरसा मुंडा यांचं तोंडाने साक्षात भगवानच बोलतात अशी श्रद्धा तेथील लोकांची झाली आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सर्व आदिवासी जनता अंदोलन करू लागली . 
बिरसा मुंडा यांनी अंधश्रद्धा  निर्मूलन केले , व्यसनमुक्ती केली . 
३ मार्च १९०० रोजी चक्रधरपूरच्या  जामकोटाई जंगलात त्यांनी झोपड़पट्टी केली होती अणि त्याच्या आदिवासी गनिमी सैन्यासह ब्रिटिश सैन्य विरुद्ध लढत होते. सुमारे ४६० आदिवासी लोकांना अटक करण्यात आली . ९ जून १९०० रोजी जेल मध्ये बिरसा मुंडा यांचा मृत्यू झाला .ब्रिटिशांनी कॉलरा मुळे  मृत्यू झाल्याचा दावा केला . पण तसे  लक्षण त्यांच्यात नव्हते . 

बिरसा मुंडा  यांच्या नावाने :

बिरसा मुंडा एअर पोर्ट ,रांची 



ENGLISH 

                             "Do not seek me in the clouds of the sky ||
I think you are in my heart. "

भगवान बिरसा मुंडा 
In 1875, India was shrouded in the darkness of slavery. The masses were lost in ignorance and superstition. The tyranny of the British was in it. Birsa Munda was born as if the sun had risen from such darkness and the Urao, Munda and Khadi tribal lands of India found their savior. He was born Birsa and was named Birsa.

Birsa's education:


Birsa was enrolled in a German missionary school. Birsa, meanwhile, was angry that his father had been forcibly converted. While studying in school, I came to know about slavery and poverty in India. Birsa witnessed many tragic incidents of exploitation. Wherever he went, there was terror.
                                                         
इंग्रज कालीन परिस्थिती दर्शवणारे एक चित्र

A thorny issue:

Birsa refused to do a government job. The East India Company imposed courts, offices, landlords and landlords on tribal lands and crops. Like all the tribes, Birsa's house had nothing to eat. A member of the family went hungry and his father killed him in anger after seeing Birsa's refusal to accept a government job. Birsa went to the river bank crying. His body was being cremated in a nearby cemetery. After the funeral, Birsa went there and dug the grave of the deceased, removed the ornaments offered to him, brought food and satisfied the hunger of the family. When Birsa was questioned by his family, he said, "God is merciful." The incident was first witnessed by a villager, the villager came running to Birsa's house and told the fact to his father. When asked by his father, Birsa said, "Muddya is not hungry, a living person is hungry, so I brought the ornaments."

How Birsa Munda got the status of God:

When Birsa considered the tribal area, he saw divisions, poverty, discrimination and disunity. He met the leaders of Urao and Munda Khadi tribes. He started public awareness. Awakened the flame of knowledge and power among the exploited and oppressed tribals.
जण जग्रुती करतांना बिरसा मुंडा
In this way, they continued their awareness movement by eating whatever they could get from the forest and going hungry. Birsa Munda spent many days in the forest. Later he met Panditji as Anand Pandey. He took Birsa Munda home with him. Living with Anand Pandey, he learned about culture and society.
Along with this he acquired Ayurvedic knowledge. They used to go to the forest in search of various medicinal plants. Birsa later made advances in pharmacology with astonishing intellect and diligence.
Later Birsa returned to his village. His mother saw his forehead gleaming. At that time, Birsa Munda told us that he had seen Lord Singh Bonga. "Singh Bonga himself has blessed you to be able to cure any patient. He also ordered me to free the Mundas from the landlords, the Jahigirdars, the Firangis."
In this way, the people of the area came to believe that Birsa Munda speaks God in person and all the tribal people started agitating under the leadership of Lord Birsa Munda.
Birsa Munda eradicated superstition, detoxified.
He had taken up residence in the Jamkopai forest of Chakradharpur on March 3, 1900 and was fighting against the British forces along with his tribal guerrilla forces. About 460 tribal people were arrested. Birsa Munda died on June 9, 1900 in Ranchi Jail. The British claimed that he died of cholera, but never showed symptoms of the disease.

In the name of Birsa Munda:

Birsa Munda Airport, Ranchi


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या